लहान मुलांचे विश्व दाखवत नाळ जोडणारा सिनेमा – परिक्षित करपे

 

लहान मुलांचे विश्व दाखवत नाळ जोडणारा सिनेमा – परिक्षित करपे

बाल कलाकार श्रीनिवासचा सहजसुंदर अभिनय, उत्तम संगीत आणि उत्तम सिनेमाटोग्राफी. तांत्रिकदृष्ट्या सिनेमा उत्तम आहे.   का पाहू नये : इमोशनल टच सिनेमांची आवड नसणारे यांनी   कथा : लहान मुलांचे भावविश्व यात अतिशय निरागसपणे दाखवण्यात आले आहे. आपण दत्तक घेतलेले आहोत हे कळल्यानंतर एखाद्या लहान मुलाचे मन, स्वभाव आणि त्याचा वावर कसा बदलतो हे उत्तमरित्या दिग्दर्शकाने अतिशय वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर मांडले आहे.   #श्रीनिवासला या सिनेमासाठी #राष्ट्रीय पुरस्कार नक्कीच मिळेल. (सर्वोत्कृष्ट बालकलाकार)   या सिनेमाला मी देतोय तीन स्टार्स ⭐⭐⭐ चांगला.   चित्रपट 5-10 कोटींचा व्यवसाय करील.