Month: April 2019

 

शेती शाळा २०१९-२०

मा. श्री. सुहास दिवसे आयुक्त कृषि यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली खरीप हंगाम २०१९ पासून राज्यात कृषी विस्ताराला बूस्ट देण्यासाठी कधी काळी प्रभावी ठरलेल्या शेतीशाळा ‘पॅटर्न’ राबविण्यात येणार आहे. ज्या भागात जे पीक आहे; त्या पिकावर आधारित शेतीशाळा घेतल्या जातील. औषधी वनस्पती असलेल्या भागात त्या पिकाची शेतीशाळा राहील. सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, हरभरा या पिकांच्यादेखील शेतीशाळा राहतील.

 

 


शेती शाळेच्या अधिक माहितीसाठी येथे पहा :- शेती शाळा ‘पॅटर्न’ २०१९-२० 
 

रफ्तार -कृषी उद्यमिता विकास केंद्र (R-ABI)

भारत सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत कृषिउद्यमिता  विकास हाती घेण्यात आला आहे. ह्यापैकी केंद्रीय कापुस प्रौदयागिकी अनुसंधान संस्था , माटुंगा , मुंबई येथे  रफ्तार -कृषी उद्यमिता विकास केंद्र (R-ABI) सुरु करण्यात आले आहे. ह्यामध्ये कृषी व संलग्न क्षेत्रामधील विविध कल्पना / पूर्व – बीज स्टेज व कृषिउद्यमिता स्टार्टअपसाठी ८५% पर्यंत भांडवल देण्यात येणार आहे. कृषी व संलग्न क्षेत्रातील नवीन कल्पना स्टार्टअपसाठी कापुस प्रौदयागिकी अनुसंधान संस्था , माटुंगा , मुंबई येथील रफ्तार -कृषी उद्यमिता विकास केंद्र (R-ABI)  मध्ये २ महिने कृषी उद्यमिता अभिमुखता (ओरीएंटेशन ) कार्यक्रमात सहभागी होऊन त्यावर काम करावे लागेल. सहभागी व्यक्तीला दोन महिन्यांसाठी प्रति महिना  रु १० हजार स्टायपेंड (शिष्यवृत्ती)  देण्यात येईल. ह्यादरम्यान  स्टार्टअप म्हणून नोंदणी करावी लागेल. दोन महिन्यानंतर सादरीकरणावर आधारित २० नावीन्यपूर्ण कल्पनांसाठी रु. ५ लाखापर्यंत अनुदान देण्यात येईल. ह्या व्यतिरिक्त  २० स्टार्टअप प्रस्तावांना रु २५ लाखांपर्यंत बीज अनुदान देण्यात येईल. आवाहन करण्यात येत आहे की ज्या व्यक्तींना कृषी व संलग्न घटक क्षेत्रामधे  कृषी उद्यमि / उद्योजक बनायचे असेल तर त्यांनी प्रस्ताव खालील पत्यावर  सादर करावे.
CEO, R-ABI, ICAR-CIRCOT, Adenwala Road, Matunga, MUMBAI – 400019. Ph. 022-24143718
अधिक माहितीसाठी मार्गदर्शक सूचना पहा- मार्गदर्शक सूचना RKVY-RAFTAAR