Month: December 2017

 

किसान सुविधा

किसान सुविधा
किसान सुविधा अँड्रॉइड ॲप  कृषी मंत्रालय भारत सरकार यांनी तयार केलेले असून गुगल प्ले स्टोअर वर ते मोफत उपलब्ध आहे. हे ॲप इंग्रजी हिंदी मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे. मराठी भाषेत उपलब्ध असल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी त्याचा सहज वापर करू शकतो.
अॅप इन्स्टॉल केल्यानंतर नोंदणी करताना नाव मोबाईल नंबर भाषा जिल्हा तालुका त्यानंतर गाव निवडून नोंदणी करावी. नोंदणी करणे एकदम सुटसुटीत व सोपे आहे.
शेतकऱ्यांना लागवडीपासून तर थेट विक्रीपर्यंत तसेच साठवणुकीची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून किसान सुविधा अॅप निर्मिती करण्यात आली आहे. या ॲपमध्ये 8 मुख्य विभाग करण्यात आले असून अनेक उपविभाग आहेत.
१. हवामान- रोजच्या हवामानाबरोबरच पुढील पाच दिवसाच्या हवामानाचा अंदाजही वर्तविण्यात येतो. नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना वर्तविली जाते. तापमान वाऱ्याचा वेग आर्द्रतेचे प्रमाण तसेच झालेला पाऊस याची माहिती या भागात मिळते.
२. विक्रेता- शेतकऱ्यांना दैनंदिन तेथे काम करताना अनेक गोष्टी बाजारातून खरेदी कराव्या लागतात. दर्जेदार निविष्ठा तसेच अवजारे खरेदी करण्या विषयी अनेकदा संभ्रम असतो. या विभागात मान्यताप्राप्त विक्रेत्यांची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
३. बाजार किंमत – शेतमालाचे बाजारभाव बाजार समिती निहाय येथे दाखविले जातात त्याचबरोबर 50 किलोमीटर अंतरामधील सर्व बाजार समित्या व त्यामध्ये खरेदी विक्री केल्या जाणाऱ्या शेतमालाचे बाजारभाव येथे पाहवयास मिळतात.
४. वनस्पती संरक्षण- विविध पिकांचे संरक्षण कसे करावे याचे चार अवस्थेमधील सविस्तर माहिती दिली आहे.
५. कृषी सल्ला- महाराष्ट्रातील सर्व कृषी विज्ञान केंद्र तसेच कृषी विद्यापीठांमार्फत प्रसारित करण्यात आलेले शेती विषयक संदेश यामध्ये दर्शविले जातात.
६. के सी सी संपर्क- किसान कॉल सेंटर लागले संपर्क साधण्याचे सुविधा यामध्ये देण्यात आलेली आहे.
७. जमीन आरोग्य पत्रिका- आपल्या गावातील मृदा आरोग्य पत्रिका पाहण्यासाठी.
८. कोल्ड स्टोरेज व गोदाम – आपल्या जिल्ह्यात शेतमाल साठविण्यासाठी उपलब्ध असलेले कोल्ड स्टोरेज तसेच गोदामांची माहिती यामध्ये आहे…..
डाऊनलोड करा
सुखदेव जमदाडे
9881907000