Month: August 2017

 

अॅप च्या मदतीने करा रोग किडींचे निदान

संगणक क्रांती झाल्यानंतर माहिती तंत्रज्ञानाने माणसांचे आयुष्य व्यापून टाकले. बऱ्याचशा गोष्टी मध्ये माहिती तंत्रज्ञान आपण ठळक मथळा वापरत असतो परंतु मानवी संस्कृतीच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका असणारे शेती क्षेत्र यापासून काहीसे दूर होते.  बाजार  भावांची माहिती हवामानाचे अंदाज  काही प्रमाणात लागवड तंत्रज्ञान येथपर्यंत सीमित झाल्यासारखे होते. प्रत्यक्ष शेतावर माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर फारसा करता येत नव्हता.  शेतीचे प्रश्न स्थानिक पातळीवर माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने सोडविणे अपेक्षित  होते
स्मार्टफोन उपलब्ध झाल्यानंतर माहिती तंत्रज्ञानाचा वापर शेतामध्ये करणे काही प्रमाणात शक्य झाले आहे. आज अनेक प्रकारचे अॅप उपलब्ध आहेत त्यातील एक म्हणजेच   Plantix- Grow smart
हे app  जर्मनीच्या peat कंपनीने तयार केले असून ते अनेक भाषेमधे चालते यामध्ये रोग-किडींचे निदान आपल्या शेतातील पिकांच्या फोटोंच्या मदतीने केले जाते आपल्याला फक्त प्रादुर्भाव ग्रस्त पिकांचा फोटो काढून अपलोड करायचा आहे आपल्या फोटोंचे app कडून विश्लेषण होऊन रोग-किडींचे ओळख सांगितली जाते व त्याचबरोबर उपाय योजनाही सांगितले जाते.  म्हणजेच शेतकऱ्यांचे प्रश्न  त्याच्या शेतावरच सोडविण्यास मदत होते
विशेष म्हणजे  या टॅबचा  भारतामध्ये  प्रचार व प्रसार ICRISAT  या संस्थेमार्फत करण्यात येत आहे.
google play store वरती मोफत उपलब्ध आहेत किंवा खाली दिलेल्या लिंक  वरुन  डाऊनलोड करता येईल.
Plantix- Grow smart येथे डाउनलोड करा 
Sukhdeo Jamdhade
9881907000