Month: November 2018

 

भन्नाट तंत्रज्ञानाचा दणदणीत 2.O आविष्कार…! हॉलिवूडला लाजवेल असा चित्रपट.. परीक्षित करपे

2.O (Two Point ओ)

भन्नाट तंत्रज्ञानाचा दणदणीत 2.O आविष्कार…!
हॉलिवूडला लाजवेल असा चित्रपट…!

#का पाहावा :

1.अक्षय कुमार आणि रजनीकांतचा जबरदस्त अभिनयाने चित्रपटांत जीव ओतला आहे.
2.सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स आणि जबरदस्त ऍक्शन
3. 20 कोटी खर्च करून बनवलेले शेवटचे तू ही रे गाणे
4. एक अतिशय महत्वाचा संदेश ‘पृथ्वीवर जगण्याचा सर्व सजीवांना #समान हक्क आहे’ आणि तंत्रज्ञानाचा अतिवापर किती घातक आहे हे तुम्ही पडद्यावरच पहा.
5. 2.O च्या एन्ट्री चा कलायमॅक्स…

#का पाहू नये : अरसिकांनी…!

अभिनय : चित्रपटांच्या सर्व प्रमुख कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. रजनीकांतने चित्रपटात चार चाँद लावले आहेत त्याच स्क्रीनवर असणे खूपच उत्साहवर्धक आहे.

All Credit goes to #शंकर आणि त्याच्या VFX बनवणाऱ्या टीमला हॅट्सऑफ..!

या सिनेमाला मी देतोय ★★★★ (चार स्टार्स – उत्कृष्ट)

हा सिनेमा भारतात 500 – 700 कोटी व्यवसाय करील.
एकूण Wordwide Collection 1000 ते 1200 कोटीच्या घरात जाईल….

 

विभागीय कृषि सह संचालक यांना 1लाख मर्यादेपर्यंत च्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती मंजुरीचे अधिकार

कृषि आयुक्तालय च्या अधिनस्त अधिकारी/कर्मचारी यांच्या रू. 1लाख मर्यादेपर्यंत च्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती ची मंजुरी विभागीय कृषि सह संचालक हे देतील याबाबत चा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. याची लिंक आपल्या सहाय्यक कृषि अधिकारी वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

लहान मुलांचे विश्व दाखवत नाळ जोडणारा सिनेमा – परिक्षित करपे

बाल कलाकार श्रीनिवासचा सहजसुंदर अभिनय, उत्तम संगीत आणि उत्तम सिनेमाटोग्राफी. तांत्रिकदृष्ट्या सिनेमा उत्तम आहे.

 

का पाहू नये : इमोशनल टच सिनेमांची आवड नसणारे यांनी

 

कथा : लहान मुलांचे भावविश्व यात अतिशय निरागसपणे दाखवण्यात आले आहे. आपण दत्तक घेतलेले आहोत हे कळल्यानंतर एखाद्या लहान मुलाचे मन, स्वभाव आणि त्याचा वावर कसा बदलतो हे उत्तमरित्या दिग्दर्शकाने अतिशय वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर मांडले आहे.

 

#श्रीनिवासला या सिनेमासाठी #राष्ट्रीय पुरस्कार नक्कीच मिळेल. (सर्वोत्कृष्ट बालकलाकार)

 

या सिनेमाला मी देतोय तीन स्टार्स ⭐⭐⭐ चांगला.

 

चित्रपट 5-10 कोटींचा व्यवसाय करील.